<font face="mangal" size="3px">एफडीआय संबंधित फॉर्म्स, 8 फेब्रुवारी 2016 पासून ऑ&# - आरबीआय - Reserve Bank of India
एफडीआय संबंधित फॉर्म्स, 8 फेब्रुवारी 2016 पासून ऑनलाईन सादर करण्यास आरबीआयचे बँकांना सांगणे
फेब्रुवारी 1, 2016 एफडीआय संबंधित फॉर्म्स, 8 फेब्रुवारी 2016 पासून ऑनलाईन सादर करण्यास आरबीआयचे बँकांना सांगणे रिझर्व बँकेकडून आज प्राधिकृत डीलर (एडी) वर्ग-1 बँकांना सांगण्यात आले की, त्यांनी फेब्रुवारी 8, 2016 पासून, अॅडव्हान्स रिमिटन्स फॉर्म्स (एआरएफ), फॉरिन कोलॅबरेशन जनरल परमिशन रुट (एफसी-जीपीआर) आणि फॉरिन कोलॅबरेशन ट्रान्स्फर ऑफ शेअर्स (एफसी-टीआरएस) ह्यांचे सादरीकरण, अपरिहार्यतेने, केवळ ई-बिझ पोर्टल वर ऑनलाईन करावे. फेब्रुवारी 8, 2016 पासून लेखी/प्रत्यक्ष फॉर्म्स सादर करणे बंद करण्यात आले आहे. हे फॉर्म्स प्रत्यक्ष सादर करण्याच्या पर्यायाव्यतिरिक्त विदेशी थेट गुंतवणुकीबाबत व्यवहारांशी संबंधित, एआरएफ, एफसी-जीपीआर, आणि एफसी-टीआरएस फॉर्म ऑनलाईन सादर करण्याची सुविधा, सरकारच्या ई-बिझ पोर्टलवर उपलब्ध आहे. ऑगस्ट 24, 2015 रोजी, एफसी-टीआरएस मॉड्युल ई-बिझ पोर्टलवर सुरु करतांना, बँकांना कळविण्यात आले होते की, प्रत्यक्ष सादरीकरणाची पध्दत तीन महिन्यांतच खंडित केली जाईल. हे फॉर्म्स संपूर्णतः ऑनलाईन सादर करण्याबाबतचा निर्णय, हे फॉर्म्स ऑनलाईन सादर करण्यामधील एडी वर्ग-1 बँकांच्या तयारीचे मूल्यमापन केल्यानंतरच घेण्यात आला आहे. अल्पना किल्लावाला वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/1803 |