<font face="mangal" size="3">“ऑल बँक बॅलन्स एनक्वायरी” अॅप बाबत आरबीआय द् - आरबीआय - Reserve Bank of India
78471785
प्रकाशित तारीख
एप्रिल 11, 2015
“ऑल बँक बॅलन्स एनक्वायरी” अॅप बाबत आरबीआय द्वारे सावधानतेचा इशारा
एप्रिल 11, 2015 “ऑल बँक बॅलन्स एनक्वायरी” अॅप बाबत आरबीआय द्वारे सावधानतेचा इशारा भारतीय रिझर्व बँकेच्या नजरेस आले आहे की ग्राहकांच्या बँक खात्यातील शिल्लक रकमा तपासता याव्यात, केवळ ह्याच उद्देशाने, व्हॉट्स अॅपवर एक अॅप (अॅप्लिकेशन) फे-या मारत आहे. ह्या अॅप्लिकेशनवर, “ऑल बँक बॅलन्स एनक्वायरी नंबर” ह्या शीर्षकासह आरबीआयचा लोगो (बोधचिन्ह) असून त्यावर, मोबाईल क्रमांक किंवा कॉल सेंटर क्रमांक असलेल्या अनेक बँकांची यादी आहे. रिझर्व बँक येथे स्पष्ट करु इच्छिते की, तिने असे कोणतेही अॅप्लिकेशन विकसित केलेले नाही. ह्यासाठी जनतेला सांगण्यात येते की, त्यांनी ह्या अॅप्लिकेशनचा उपयोग स्वतःच्याच जबाबदारीवर करावा. अल्पना किल्लावाला वृत्तपत्रासाठी निवेदन : 2014 2015/2148 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?