<font face="mangal" size="3">आभासी चलने वापरणारांना आरबीआयचा सावधानतेचा - आरबीआय - Reserve Bank of India
78477529
प्रकाशित तारीख
फेब्रुवारी 01, 2017
आभासी चलने वापरणारांना आरबीआयचा सावधानतेचा इशारा
फेब्रुवारी 01, 2017 आभासी चलने वापरणारांना आरबीआयचा सावधानतेचा इशारा भारतीय रिझर्व बँकेने, वृत्तपत्र निवेदन दि. डिसेंबर 24, 2013 च्या मार्फत, बिटकॉईन्स सह, आभासी चलन (व्हीसी) वापरणारे, धारण करणारे व व्यापार करणारे ह्यांना, त्याबाबत त्यांना येऊ शकणा-या संभाव्य/भावी आर्थिक, कार्यकारी कायदेशीर, ग्राहक संरक्षण व सुरक्षा संबंधीच्या जोखमीं/धोक्यांबाबत सावधान केले होते. भारतीय रिझर्व बँकेकडून सांगण्यात येत आहे की, तिने, अशा योजना किंवा बिटकॉन किंवा आभासी चलन प्रचारित करण्यासाठी कोणत्याही संस्थेला/कंपनीला कोणताही परवाना/प्राधिकृतीकरण दिलेले नाही. त्यामुळे, आभासी चलनांचा वापर करणारी, बाळगणारी, त्यात ट्रेडिंग करणारी व्यक्ती ते स्वतःच्याच जोखमीवर करत असेल. जोस जे. कत्तूर वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2054 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?