<font face="mangal" size="3">अॅक्सिस बँकेवरील अफवांचा आरबीआयकडून इन्कार - आरबीआय - Reserve Bank of India
78490752
प्रकाशित तारीख डिसेंबर 12, 2016
अॅक्सिस बँकेवरील अफवांचा आरबीआयकडून इन्कार
डिसेंबर 12, 2016 अॅक्सिस बँकेवरील अफवांचा आरबीआयकडून इन्कार भारतीय रिझर्व बँकेने आज स्पष्ट केले आहे की, वरील बँकेच्या काही शाखांमधील विहित बँक नोटा जमा करणे/बदलून देणे ह्याबाबतच्या व्यवहारांमधील काही गंभीर स्वरुपाच्या अनियमिततांबाबतच्या विशिष्ट आरोपांबाबत, त्या बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्याबाबत तिने कोणतीही कारवाई सुरु केलेली नाही. वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला जाऊ शकतो. अशा माध्यमांमधील काही अफवांच्या पार्श्वभूमीवर वरील स्पष्टीकरण देण्यात येत आहे. अल्पना किलावाला वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1487 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?