<font face="mangal" size="3">नवोदय अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., नागपुर, ह्यांना - आरबीआय - Reserve Bank of India
नवोदय अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., नागपुर, ह्यांना देण्यात आलेल्या निर्देशांना आरबीआयकडून जुलै 15, 2018 पर्यंत मुदतवाढ
जानेवारी 24, 2018 नवोदय अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., नागपुर, ह्यांना देण्यात आलेल्या निर्देशांना नवोदय अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., नागपुर ह्यांना देण्यात आलेल्या निर्देशांना भारतीय रिझर्व बँकेने पुनरावलोकनाच्या अटीवर आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. हे निर्देश आता, पुनरावलोकनाच्या अटीवर, 15 जुलै 2018 पर्यंत वैध आहेत. वरील निर्देश, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली लागु करण्यात आले होते. संबंधित जनतेच्या माहितीसाठी वरील निर्देशांची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे. रिझर्व बँकेने वरील निर्देश दिले ह्याचा अर्थ, रिझर्व बँकेने त्या बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेतला जाऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ही बँक तिचे बँकिंग व्यवहार निर्बंधांसह करु शकते. परिस्थितीवर अवलंबून, ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2028 |