<font face="mangal" size="3px">टायर 3 ते 6 केंद्रासाठी, पॉईंट ऑफ सेल (पीओएस) मध्य&# - आरबीआय - Reserve Bank of India
टायर 3 ते 6 केंद्रासाठी, पॉईंट ऑफ सेल (पीओएस) मध्ये, रोख रकमेची निकासी करण्याची मर्यादा आरबीआयने दुप्पट केली आहे
ऑगस्ट 27, 2015 टायर 3 ते 6 केंद्रासाठी, पॉईंट ऑफ सेल (पीओएस) मध्ये, रोख रकमेची निकासी करण्याची मर्यादा आरबीआयने दुप्पट केली आहे. टायर 3 ते 6 केंद्रासाठी, पॉईंट ऑफ सेल (पीओएस) मधून रोख रकमेची निकासी करण्याची मर्यादा आरबीआयने दुप्पट, म्हणजे प्रति दिवस रु.1000/- ची रु.2000/- केली आहे. ही सुविधा केवळ बँकांनी दिलेल्या डेबिट कार्डांना व ओपन सिस्टिम प्रिपेड कार्डांनाच उपलब्ध असेल. कमी रक्कम जवळ बाळगणारा समाज नजरेपुढे ठेवून, ह्या वाढीव रक्कम/मर्यादेमुळे ग्राहकांची अधिक सोय होईल व त्याचबरोबर, टायर 3 ते 6 केंद्रामधील रोकड रकमेचे पुनर्-चक्रावर्तन (रिसायक्लिंग) होण्यास मदत होईल असे अपेक्षित आहे. ई-पेमेंट्स व संबंधित इतर विकास ह्यामधील प्रगती नजरेसमोर ठेवून ह्या सुविधेचे पुनरावलोकन केले जाईल. टायर 1 व टायर 2 केंद्रामध्ये, रु.1000/- प्रतिदिवस ह्या मर्यादित कोणताही बदल नाही. आकार-रचनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी बँकांना सांगण्यात आले होते की, काही ग्राहक आकार लावण्यात आले असल्यास, ते आकार, सर्वच केंद्रामध्ये, व्यवहाराच्या रकमेच्या 1% पेक्षा जास्त असू नयेत. ही सुविधा कार्यान्वित केली गेली असलेल्या सर्व व्यापारी संस्था/दुकानांनी, रोख रक्कम काढण्याची ही सुविधा व त्याबाबतचे ग्राहक-आकार स्पष्टपणे प्रदर्शित निर्देशित करावेत. त्यांनी खरेदी केलेली असली अथवा नसली तरीही कार्डधारक ही सुविधा वापरु शकतात. एखाद्या एटीएम प्रमाणेच, कार्ड धारकांनी, त्या पीओएसमध्ये त्यांचे कार्ड स्वाईप करावे आणि सत्यांकन करण्यासाठी पीआयएन उपलब्ध करुन द्यावा. येथे स्मरण व्हावे की, जुलै 2009 मध्येच, रिझर्व बँकेने, डेबिट कार्डांसाठी, पॉईंट ऑफ सेलमध्ये, रोख रकमेची निकासी करण्यास अधिकृत केले होते. त्यानंतर, सप्टेंबर 2013 मध्ये ही सुविधा, बँकांनी दिलेल्या प्रिपेड कार्डांनाही उपलब्ध करण्यात आली होती. अल्पना किल्लावाला वृत्तपत्रांसाठी निवेदन : 2015-2016/511 |