<font face="mangal" size="3">दि सी के पी सहकारी बँक लि. मुंबई, महाराष्ट्र, ह्ë - आरबीआय - Reserve Bank of India
दि सी के पी सहकारी बँक लि. मुंबई, महाराष्ट्र, ह्यांना दिलेल्या सूचनांना आरबीआयकडून मुदतवाढ
02 नोव्हेंबर, 2015 दि सी के पी सहकारी बँक लि. मुंबई, महाराष्ट्र, दि सी के पी सहकारी बँक लि. ह्यांना, रिझर्व बँकेने, ऑक्टोबर 28, 2015 रोजी दिलेल्या सूचनांना, रिझर्व बँकेने, ऑक्टोबर 31, 2015 रोजी व्यवहार बंद झाल्यापासून पुढील तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. ह्या सूचनांचे पुनरावलोकन केले जाऊ शकते. ह्या निदेशातील अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. ऑक्टोबर 28, 2015 रोजीच्या बदल अधिसूचित करणा-या निदेशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी, वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे. रिझर्व बँकेने वरील निदेशात केलेल्या बदलाचा अर्थ, त्या बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे, असा लावण्यात येऊ नये. एप्रिल 30, 2014 रोजी, मे 2, 2015 च्या व्यवहार बंद झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी, रिझर्व बँकेने, सी के पी सहकारी बँकेला ह्या निदेशांखाली ठेवले होते. ह्या निदेशांची वैधता, ऑक्टोबर 21, 2014 (नोव्हेंबर 1, 2014 च्या व्यवहार बंद झाल्यापासून), जानेवारी 20, 2015 रोजी (जानेवारी 31, 2015 च्या व्यवहार बंद झाल्यापासून), व जुलै 9, 2015 रोजी (जुलै 31, 2015 च्या व्यवहार बंद झाल्यापासून) अनुक्रमे तीन महिने, सहा महिने व तीन महिने वाढविण्यात आली होती. अल्पना किल्लावाला वृत्तपत्र निवेदन: 2015-2016/1052 |