<font face="mangal" size="3">अजिंक्यतारा सहकारी बँक लि., सातारा, महाराष्ट्&# - आरबीआय - Reserve Bank of India
अजिंक्यतारा सहकारी बँक लि., सातारा, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून दिलेल्या निदेशांना सप्टेंबर 30, 2016 पर्यंत मुदतवाढ
मार्च 30, 2016 अजिंक्यतारा सहकारी बँक लि., सातारा, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून दिलेल्या निदेशांना भारतीय रिझर्व बँकेने अधिसूचित केले आहे की, अजिंक्यतारा सहकारी बँक लि., सातारा ह्यांना, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ खाली, सप्टेंबर 28, 2015 च्या निदेशानुसार, सप्टेंबर 30, 2015 रोजी व्यवहार संपल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निदेशांखाली ठेवण्यात आले होते. जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, मार्च 29, 2016 रोजीच्या सुधारित निदेशांच्या अन्वये, अजिंक्यतारा सहकारी बँक लि., सातारा ह्यांना, सप्टेंबर 28, 2015 रोजी दिले गेलेले निदेश त्यांना आणखी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी, म्हणजे सप्टेंबर 30, 2016 पर्यंत, पुनरावलोकनाच्या अटीवर लागु असणे सुरुच राहील. ह्या निदेशाच्या इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मार्च 29, 2016 च्या निदेशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व बँकेने केलेल्या वरील बदल/सुधारणेचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा लावण्यात येऊ नये. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2301 |