गोकुल सहकारी अर्बन बँक लि., सिकंदराबाद ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ
एप्रिल 3, 2017 गोकुल सहकारी अर्बन बँक लि., सिकंदराबाद ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 35अ खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने निदेश दिले आहेत की, गोकुल सहकारी बँक लि., सिकंदराबाद ह्यांना, एप्रिल 4, 2017 रोजी व्यवहार बंद झाल्यावर दिलेले/लागु केलेले निदेश, पुनरावलोकनाच्या अटीवर जून 30, 2017 पर्यंत त्या बँकेला लागु असणे सुरुच राहील. संदर्भित निदेशामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. मार्च 24, 2017 रोजीच्या निदेशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2665 |
पेज अंतिम अपडेट तारीख: