RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

आरबीआई की घोषणाएं
आरबीआई की घोषणाएं

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78454301

श्री गणेश सहकारी बँक लि., नाशिक, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून दि. सप्टेंबर 29, 2016 पर्यंत मुदतवाढ

मार्च 28, 2016

श्री गणेश सहकारी बँक लि., नाशिक, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून दि. सप्टेंबर 29, 2016 पर्यंत मुदतवाढ

भारतीय रिझर्व बँकेने अधिसूचित केले आहे की, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35 (अ) खाली, श्री गणेश सहकारी बँक लि., नाशिक ह्यांना, एप्रिल 01, 2013 रोजीच्या निदेशान्वये, सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निदेशांखाली ठेवण्यात आले होते.  वरील निदेशाची वैधता, आमचे निदेश दि. सप्टेंबर 23, 2013, मार्च 27, 2014, सप्टेंबर 17, 2014, मार्च 19, 2015 आणि सप्टेंबर 15, 2015 अन्वये, प्रत्येकी सहा महिन्यांसाठी पाच वेळा विस्तारित करण्यात आली होती.  जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, मार्च 11, 2016 रोजी दिलेल्या सुधारित निदेशांनुसार, गणेश सहकारी बँक लि. ह्यांना, एप्रिल 1, 2013 रोजी देण्यात आलेल्या निदेशाची (ज्याची वैधता मार्च 29, 2016 पर्यंत वाढविण्यात आली होती) वैधता, त्या बँकेला मार्च 30, 2016 पासून ते सप्टेंबर 29, 2016 पर्यंत पुढील सहा महिन्यांसाठी पुनरावलोकनाच्या अटीवर लागु असणे सुरुच राहील.  संदर्भित निदेशांच्या इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.  जनतेच्या माहितीसाठी मार्च 11, 2016 च्या निदेशाची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरीलप्रमाणे केलेल्या बदलाचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा लावला जाऊ नये.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्रासाठी निवेदन - 2015-2016/2267

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?