RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78472643

श्री. साई नागरी सहकारी बँक लि. मुखेड, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या सूचनांना, जून 30, 2016 पर्यंत मुदतवाढ

जानेवारी 1, 2016

श्री. साई नागरी सहकारी बँक लि. मुखेड, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र
ह्यांना दिलेल्या सूचनांना, जून 30, 2016 पर्यंत मुदतवाढ

श्री साई नागरी सहकारी बँक लि., मुखेड, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या सूचनांना रिझर्व बँकेने, पुनरावलोकन करण्याच्या अटीवर, आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे, डिसेंबर 31, 2015 रोजी व्यवहार बंद झाल्यापासून ते जून 30, 2016 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही बँक जुलै 1, 2015 पासून सूचनांखाली होती.

बँकिंग रेग्युलेशन अधिनियम, 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ च्या पोट कलम(1) खाली तिला दिल्या गेलेल्या अधिकाराचा वापर करुन ह्या सूचना जारी करण्यात आल्या होत्या. संबंधित जनतेच्या माहितीसाठी ह्या सूचनांची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.

रिझर्व बँकेने ह्या सूचना दिल्या असण्याचा अर्थ, त्या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे असा लावला जाऊ नये. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक, निर्बंधांसह बँक व्यवहार करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून, रिझर्व बँक ह्या सूचनांमध्ये बदल करण्याचा विचार करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक महाव्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन: 2015-2016/1555

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?