<font face="mangal" size="3px">ब्रह्मावर्त वाणिज्य सहकारी बँक लि., कानपुर, उê - आरबीआय - Reserve Bank of India
ब्रह्मावर्त वाणिज्य सहकारी बँक लि., कानपुर, उत्तर प्रदेश ह्यांना आरबीआयने दिलेल्या निदेशांचा एप्रिल 6, 2016 पर्यंत मुदतवाढ
जानेवारी 5, 2016 ब्रह्मावर्त वाणिज्य सहकारी बँक लि., कानपुर, उत्तर प्रदेश ह्यांना ब्रह्मावर्त वाणिज्य सहकारी बँक लि. कानपुर, उत्तर प्रदेश ह्यांना आरबीआयने दिलेल्या निदेशांना, जानेवारी 6, 2016 ते एप्रिल 6, 2016 पर्यंत आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ पुनरावलोकनाच्या अटीवर देण्यात आली आहे. बँकिंग रेग्युलेशन अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ खाली, दिलेल्या नियमांखाली, जुलै 7, 2015 पासून ही बँक निदेशांखाली होती. ह्या निदेशांनुसार ब्रह्मावर्त वाणिज्य सहकारी बँक लि., रिझर्व बँकेची लेखी मंजुरी घेतल्याशिवाय, कोणतेही कर्ज देऊ शकणार नाही किंवा कर्जाचे नूतनीकरण करु शकणार नाही किंवा कोणतीही गुंतवणुक करु शकणार नाही किंवा निधी कर्जाऊ घेण्यासह व नवीन ठेवी घेण्यासह कोणतीही गुंतवणुक करणार नाही किंवा तिचे दायित्व व जबाबदा-या पूर्ण करण्यासाठी कोणतेही प्रदान करणार नाही किंवा अन्यथा, प्रदान करण्यास संमती देणार नाही किंवा रिझर्व बँकेच्या निदेशात अधिसूचित केल्या व्यतिरिक्त, कोणतीही तडजोड किंवा करार/व्यवस्था करुन, तिची कोणतीही मालमत्ता किंवा अॅसेट्स विकणार किंवा हस्तांतरित करणार नाही किंवा अन्य प्रकाराने त्यांची वासलात लावणार नाही. ह्याशिवाय, ह्या निदेशांच्या संपूर्ण कालावधी दरम्यान, (म्हणजे जुलै 7, 2015 ते एप्रिल 6, 2016) प्रत्येक बचत किंवा चालु किंवा अन्य कोणत्याही ठेव खात्यामधील, एकूण शिल्लकेमधून, ठेवीदाराला, एका वेळी रु.40,000 (रुपये चाळीस हजार) पर्यंतची रक्कम काढण्यास ही बँक परवानगी देऊ शकते. ह्या निदेशामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. डिसेंबर 30, 2015 च्या निदेशाची प्रत, जनतेच्या माहितीसाठी सदरहू बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे. रिझर्व बँकेने दिलेल्या निदेशात केलेल्या बदलाचा अर्थ, ह्या बँकेची आर्थिक स्थिती सुधारली किंवा अधिक बिघडली आहे असा केला जाऊ नये. परिस्थितीवर अवलंबून रिझर्व बँक त्या निदेशात बदल करण्याचा विचार करु शकते. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन: 2015-2016/1578 |