RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78474331

ब्रम्हावर्त कमर्शियल सहकारी बँक लि. कानपुर, उत्तरप्रदेश ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून जुलै 06, 2016 पर्यंत मुदतवाढ

एप्रिल 05, 2016

ब्रम्हावर्त कमर्शियल सहकारी बँक लि. कानपुर, उत्तरप्रदेश ह्यांना दिलेल्या निदेशांना
आरबीआयकडून जुलै 06, 2016 पर्यंत मुदतवाढ

ब्रम्हावर्त कमर्शियल सहकारी बँक लि., कानपुर, उत्तर प्रदेश ह्यांना दिलेल्या निदेशांना भारतीय रिझर्व बँकेने, एप्रिल 07, 2016 पासून जुलै 06, 2016 पर्यंत अशी तीन महिन्यांची मुदतवाढ पुनरावलोकनाच्या अटींवर दिली आहे. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35 अ खाली देण्यात आलेल्या निदेशांखाली वरील बँक जुलै 07, 2015 पासून ठेवण्यात आली होती. वरील निदेश सुधारित करण्यात आला व त्याची वैधता एप्रिल 06, 2016 पर्यंत वाढविण्यात आली. मार्च 28, 2016 च्या निदेशान्वये ह्या निदेशांची वैधता जुलै 6, 2016 पर्यंत वाढविण्यात आली. वरील निदेशांच्या इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मार्च 28, 2016 च्या ह्या निदेशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2345

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?