RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78511048

ब्रम्हावर्त कमर्शियल कोऑपरेटिव बँक लि., कानपुर, उत्तर प्रदेश ह्यांना देण्यात आलेल्या निदेशांना, आरबीआयकडून मार्च 6, 2018 पर्यंत मुदतवाढ

नोव्हेंबर 6, 2017

ब्रम्हावर्त कमर्शियल कोऑपरेटिव बँक लि., कानपुर, उत्तर प्रदेश ह्यांना देण्यात आलेल्या निदेशांना,
आरबीआयकडून मार्च 6, 2018 पर्यंत मुदतवाढ

ब्रम्हावर्त कमर्शियल कोऑपरेटिव बँक लि., कानपुर ह्यांना देण्यात आलेल्या निदेशांचा, आरबीआयकडून, पुनरावलोकनाच्या अटीवर, आणखी चार महिन्यांच्या कालावधीसाठी (नोव्हेंबर 7, 2017 ते मार्च 6, 2018) मुदतवाढ देण्यात आली आहे. वरील बँक, जुलै 7, 2015 पासून बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ खालील, निदेशांखाली ठेवण्यात आली होती. निदेश दि. नोव्हेंबर 1, 2017 अन्वये वरील निदेशांची मुदत मार्च 6, 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे. जनतेच्या माहितीसाठी नोव्हेंबर 1, 2017 रोजीच्या निदेशाची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व बँकेने निदेशात बदल केला ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा किंवा घट झाली असल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये. परिस्थितीवर अवलंबून वरील निदेशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1251

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?