<font face="mangal" size="3px">दि सुरी फ्रेंड्स युनियन सहकारी बँक लि., सुरी, प - आरबीआय - Reserve Bank of India
दि सुरी फ्रेंड्स युनियन सहकारी बँक लि., सुरी, पश्चिम बंगाल ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ
जानेवारी 10, 2017 दि सुरी फ्रेंड्स युनियन सहकारी बँक लि., सुरी, पश्चिम बंगाल ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ दि सुरी फ्रेंड्स युनियन सहकारी बँक लि., सुरी, पश्चिम बंगाल ह्यांना दिलेल्या निदेशांना, त्यात पुढील अंशतः बदल करुन, भारतीय रिझर्व बँकेने, आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. (1) कोणत्याही ठेवीदाराला रु.50,000/- पेक्षा अधिक नसलेली रक्कम काढण्यास परवानगी दिली जावी. - मात्र, जेथे अशा ठेवीदाराचे बँकेशी कोणत्याही प्रकारचे दायित्व असल्यास (कर्जदार किंवा जामीनकी, (बँकेत ठेवलेल्या ठेवींविरुध्दच्या कर्जासह)) ती रक्कम सर्वप्रथम संबंधित कर्जखात्यात समायोजित केली जावी. (2) कर्जदाराबरोबर केलेल्या कर्ज-करारामधील अटी व शर्तींमध्ये, कर्जदाराच्या विशिष्ट ठेव खात्यामधील रक्कम त्याच्या कर्जखात्यामध्ये वळती/समायोजित केली जावी. असे कलम असल्यास, बँक ती कर्जे, स्थिर ठेवींच्या विरुध्द सेट ऑफ करु शकते आणि त्या कर्जदाराच्या कर्ज खात्यामधील थकबाकीच्या रकमेपर्यंत असे वळते करण्यास/समायोजन करण्यास, काही अतिरिक्त अटींवर परवानगी आहे. (3) संचालक-संबंधित कर्जे (असल्यास) सोडून, प्रमाणभूत व प्रतिभूतित सीसी खात्यांच्या कर्ज मर्यादांचे नूतनीकरण करण्यास वरील बँकेस परवानगी आहे. त्यानुसार, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 35 अ च्या पोटकलम (1) व (2) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक निदेश देते की, दि सुरी फ्रेंड्स युनियन सहकारी बँक लि., सुरी, पश्चिम बंगाल ह्यांना, वेळोवेळी सुधारित केलेले, दि. मार्च 28, 2014 चे निदेश (शेवटचा निदेश दि. जून 29, 2016), वरील परिच्छेद 1 अनुसार केलेल्या बदलासह, पुनरावलोकनाच्या अटीवर, आणखी सहा महिन्यांसाठी म्हणजे, जानेवारी 7, 2017 ते जुलै 6, 2017 पर्यंत लागु असणे सुरुच राहील. संदर्भित निदेशामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1839 |