RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78493163

जामखेड मर्चंट्स सहकारी बँक लि., अहमदनगर, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ

एप्रिल 13, 2017

जामखेड मर्चंट्स सहकारी बँक लि., अहमदनगर, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ

एप्रिल 12, 2016 रोजी व्यवहार बंद झाल्यापासून, जामखेड मर्चंट्स सहकारी बँक लि. अहमदनगर, महाराष्ट्र ह्यांना, निदेश दि. एप्रिल 7, 2016 रोजीच्या निदेशान्वये, सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निदेशांखाली ठेवण्यात आले होते. निदेश दि. ऑक्टोबर 6, 2016 अन्वये, वरील निदेशांची वैधता, ऑक्टोबर 13, 2016 ते एप्रिल 12, 2017 पर्यंत (सहा महिन्यांसाठी) वाढविण्यात आली होती. वरील निदेशांची वैधता, निदेश दि. एप्रिल 6, 2017 अन्वये जून 12, 2017 पर्यंत (आणखी दोन महिन्यांसाठी) पुनरावलोकनाच्या अटीवर वाढविण्यात आली आहे.

संदर्भित निदेशाच्या इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.

वरील मुदतवाढ व बदल समाविष्ट असलेल्या, दि. एप्रिल 6, 2017 च्या निदेशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी, वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरीलप्रमाणे मुदतवाढ दिली ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2776

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?