<font face="mangal" size="3">दि वैश को-ऑपरेटिव कमर्शियल बँक लि. नवी दिल्ली  - आरबीआय - Reserve Bank of India
78519300
प्रकाशित तारीख ऑगस्ट 07, 2019
दि वैश को-ऑपरेटिव कमर्शियल बँक लि. नवी दिल्ली ह्यांना देण्यात आलेल्या निर्देशांना मुदतवाढ
ऑगस्ट 7, 2019 दि वैश को-ऑपरेटिव कमर्शियल बँक लि. नवी दिल्ली बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, दि वैश को-ऑपरेटिव कमर्शियल बँक लि. नवी दिल्ली ह्यांना देण्यात आलेले शेवटून ऑगस्ट 8, 2019 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेले व वेळोवेळी सुधारित करण्यात आलेले ऑगस्ट 28, 2015 रोजीचे निर्देश, वरील बँकेला आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे, ऑगस्ट 9, 2019 ते फेब्रुवारी 8, 2020 पर्यंत पुनरावलोकनाच्या अटीवर लागु असतील. योगेश दयाल प्रेस प्रकाशन : 2019-2020/374 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?