<font face="mangal" size="3">2005 पूर्वीच्या मालिकेच्या नोटा काढून घेण्याची - आरबीआय - Reserve Bank of India
2005 पूर्वीच्या मालिकेच्या नोटा काढून घेण्याची तारीख आरबीआय वाढवणार
जून 25, 2015 2005 पूर्वीच्या मालिकेच्या नोटा काढून घेण्याची तारीख आरबीआय वाढवणार 2005 पूर्वीच्या बँक नोटा बदलून देण्याची तारीख आरबीआयद्वारे आता डिसेंबर 31, 2015 पर्यंत वाढविण्यात आली आहे. डिसेंबर 2014 मध्ये तिने, नोटा बदलण्याची अंतिम तारीख जून 30, 2015 अशी ठरविली होती. ह्या नोटा चलनामधून काढून घेण्यासाठी जनतेचे सहकार्य मिळावे ह्यासाठी, रिझर्व बँकेने विनंती केली होती की, जनतेने जुन्या डिझाईनच्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा कराव्यात किंवा त्यांच्या सोयीच्या बँक शाखेतून बदलून घ्याव्यात. रिझर्व बँकेकडून सांगण्यात आले आहे की, ह्या नोटा बदलताना त्यांची संपूर्ण किंमत मिळेल. अशा सर्व नोटा वैध चलन म्हणूनच समजण्यात येतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ह्या कारवाईचे स्पष्टीकरण देताना, रिझर्व बँकेकडून सांगण्यात आले आहे की, महात्मा गांधी मालिकेतील बँक नोटा एका दशकापासून चलनात/व्यवहारात आहेत. ह्यापैकी बहुतांश नोटा बँक शाखांद्वारे काढून घेण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे उर्वरित जुन्या डिझाईनच्या नोटा व्यवहारांमधून काढून घेण्याचे ठरविण्यात आले आहे. एकाच वेळी, विविध मालिकांच्या नोटा व्यवहारात न ठेवणे ही एक प्रमाणित आंतरराष्ट्रीय रीत आहे, असे रिझर्व बँकेकडून सांगण्यात आले. जनतेला कोणत्याही प्रकारे त्रास/अडचणी येऊ नयेत ह्यासाठी, रिझर्व बँक ह्या प्रक्रियेवर देखरेख ठेवणे व आढावा घेणे सुरुच ठेवील. अल्पना किल्लावाला वृत्तपत्रासाठी निवेदन : 2014-2015/2751 |