<font face="mangal" size="3">एचसीबीएल सहकारी बँक लि., लखनौ, उत्तर प्रदेश ह्य& - आरबीआय - Reserve Bank of India
एचसीबीएल सहकारी बँक लि., लखनौ, उत्तर प्रदेश ह्यांना दिलेल्या निदेशांच्या वैधतेला आरबीआयद्वारे एप्रिल 15, 2017 पर्यंत मुदतवाढ
ऑक्टोबर 14, 2016 एचसीबीएल सहकारी बँक लि., लखनौ, उत्तर प्रदेश ह्यांना दिलेल्या निदेशांच्या वैधतेला आरबीआयद्वारे एप्रिल 15, 2017 पर्यंत मुदतवाढ एचसीबीएल सहकारी बँक लि. लखनौ ह्यांना देण्यात आलेल्या निदेशांना भारतीय रिझर्व बँकेने, ऑक्टोबर 16, 2016 ते एप्रिल 15, 2017 पर्यंत अशी आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ पुनरावलोकनाच्या अटीवर दिली आहे. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) च्या कलम 35अ च्या खाली दिलेल्या, एप्रिल 10, 2016 रोजीच्या निदेशान्वये ही बँक, एप्रिल 16, 2016 रोजी व्यवहार बंद झाल्यापासून निदेशांखाली होती. वरील निदेश सुधारित करण्यात आला व त्याची वैधता ऑक्टोबर 15, 2016 पर्यंत वाढविण्यात आली. निदेश दि. ऑक्टोबर 7, 2016 अन्वये ही वैधता, एप्रिल 15, 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ह्या निदेशातील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. ऑक्टोबर 7, 2016 च्या निदेशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावली आहे. परिस्थितीवर अवलंबून रिझर्व बँक ह्या निदेशात बदल/सुधारणा करु शकेल. अनिरुध्द डी जाधव वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/928 |