RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78511020

ब्रह्मावर्त कमर्शियल को-ऑपरेटिव बँक लि., कानपुर, उत्तर प्रदेश ह्यांना देण्यात आलेल्या निर्देशांची वैधता आरबीआयकडून विस्तारित

मार्च 6, 2018

ब्रह्मावर्त कमर्शियल को-ऑपरेटिव बँक लि., कानपुर, उत्तर प्रदेश ह्यांना देण्यात आलेल्या निर्देशांची वैधता आरबीआयकडून विस्तारित

ब्रह्मावर्त कमर्शियल को-ऑपरेटिव बँक लि., कानपुर, उत्तर प्रदेश ह्यांना दिलेल्या निर्देशांना, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय), पुनरावलोकनाच्या अटीवर आणखी चार महिन्यांची, म्हणजे मार्च 7, 2018 ते जुलै 6, 2018 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ खाली दिलेल्या, दि. जून 30, 2015 रोजीच्या निर्देशान्वये, वरील बँक, जुलै 7, 2015 पासून निर्देशाखाली होती.

वरील निर्देशामध्ये, आरबीआयचे निर्देश दि. सप्टेंबर 23, 2015, डिसेंबर 30, 2015, मार्च 28, 2016, जून 30, 2016, डिसेंबर 30, 2016, जून 29, 2017 आणि नोव्हेंबर 1, 2017 अन्वये बदल करण्यात आले/वैधता वाढविण्यात आली. सर्वात शेवटून मार्च 6, 2018 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेल्या निर्देशाची वैधता, मार्च 1, 2018 रोजीच्या निर्देशान्वये आता, पुनरावलोकनाच्या अटीवर, आणखी 4 महिन्यांसाठी, म्हणजे मार्च 7, 2018 ते जुलै 6, 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे. संदर्भित निर्देशामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. मार्च 1, 2018 रोजीच्या निर्देशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

रिझर्व बँकेने वरील निर्देशात केलेल्या बदलाचा आणि, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा किंवा घट झाली आहे असा समजण्यात येऊ नये. परिस्थितीवर अवलंबून वरील निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2361

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?