RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78506163

इंडियन मर्कंटाईल को-ऑपरेटिव बँक लि., लखनऊ, उत्तर प्रदेश ह्यांना देण्यात आलेल्या निर्देशांच्या वैधतेमध्ये आरबीआयकडून मुदतवाढ

मार्च 9, 2018

इंडियन मर्कंटाईल को-ऑपरेटिव बँक लि., लखनऊ, उत्तर प्रदेश ह्यांना देण्यात आलेल्या निर्देशांच्या वैधतेमध्ये आरबीआयकडून मुदतवाढ

इंडियन मर्कंटाईल को-ऑपरेटिव बँक लि., लखनऊ, उत्तर प्रदेश ह्यांना देण्यात आलेल्या निर्देशांना, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) आणखी सहा महिन्यांची म्हणजे मार्च 12, 2018 ते सप्टेंबर 11, 2018 पर्यंत पुनरावलोकनाच्या अटींवर मुदतवाढ दिली आहे. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली, जून 4, 2014 रोजी दिलेल्या निर्देशांखाली वरील बँक, जून 12, 2014 पासून निर्देशांखाली होती.

वरील निर्देशात, आरबीआयचे निर्देश, दि. जुलै 30, 2014, डिसेंबर 8, 2014, जून 2, 2015, सप्टेंबर 7, 2015, ऑक्टोबर 19, 2015, डिसेंबर 7, 2015, मार्च 4, 2016, सप्टेंबर 2, 2016, नोव्हेंबर 25, 2016, मार्च 9, 2017 आणि सप्टेंबर 1, 2017 अन्वये बदलण्यात आले/वैधता वाढविण्यात आली होती. येथून मार्च 11, 2018 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेल्या निर्देशांची वैधता आता, निर्देश दि. मार्च 6, 2018 अन्वये, पुनरावलोकनाच्या अटीवर आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे मार्च 12, 2018 ते सप्टेंबर 11, 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे. मार्च 6, 2018 रोजीच्या निर्देशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व बँकेने निर्देशित केलेल्या बदलाचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा किंवा घट झाली आहे असा समजण्यात येऊ नये. परिस्थितीवर अवलंबून वरील निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2411

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?