<font face="mangal" size="3">मर्कंटाईल नागरी सहकारी बँक लि., मीरत (उत्तर प्र - आरबीआय - Reserve Bank of India
मर्कंटाईल नागरी सहकारी बँक लि., मीरत (उत्तर प्रदेश) ह्यांना आरबीआयने दिलेल्या निदेशांना मुदतवाढ
एप्रिल 04, 2016 मर्कंटाईल नागरी सहकारी बँक लि., मीरत (उत्तर प्रदेश) ह्यांना आरबीआयने दिलेल्या निदेशांना मुदतवाढ भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय), मर्कंटाईल नागरी सहकारी बँक लि., मीरत (उत्तर प्रदेश) ह्यांना दिलेल्या निदेशांना एप्रिल 06, 2016 पासून ऑक्टोबर 05, 2016 पर्यंत सहा महिन्यांची मुदतवाढ, पुनरावलोकनाच्या अटीवर दिली आहे. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35 अ खाली, सप्टेंबर 30, 2015 च्या निदेशान्वये वरील बँक ऑक्टोबर 06, 2015 पासून निदेशांखाली होती. मार्च 29, 2016 च्या सुधारित निदेशानुसार वरील निदेशांना, एप्रिल 06, 2016 ते ऑक्टोबर 05, 2016 अशी सहा महिन्यांची मुदतवाढ, पुनरावलोकनाच्या अटीवर देण्यात आली आहे. संदर्भित निदेशाच्या इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. मार्च 29, 2016 च्या निदेशाची एक प्रत, वरील बँकेच्या कार्यालयात जनतेच्या माहितीसाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. रिझर्व बँकेने निदेशात केलेला बदल ह्याचा अर्थ वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारली किंवा घसरली आहे असा लावण्यात येऊ नये. परिस्थितीवर अवलंबून, ह्या निदेशात बदल करण्याचा विचार आरबीआय करु शकते. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2334 |