<font face="mangal" size="3px">युपी सिव्हिल सेक्रेटरियट को-ऑपरेटिव बँक लि., ल - आरबीआय - Reserve Bank of India
युपी सिव्हिल सेक्रेटरियट को-ऑपरेटिव बँक लि., लखनौ, (उत्तर प्रदेश) ह्यांना दिलेल्या निर्देशांच्या वैधतेत वाढ
मार्च 25, 2019 युपी सिव्हिल सेक्रेटरियट को-ऑपरेटिव बँक लि., लखनौ, (उत्तर प्रदेश) ह्यांना दिलेल्या निर्देशांच्या वैधतेत वाढ भारतीय रिझर्व बँकेने, युपी सिव्हिल सेक्रेटरियट को-ऑपरेटिव बँक लि., लखनौ, ह्यांना दिलेल्या निर्देशांना आणखी सहा महिन्यांसाठी म्हणजे मार्च 26, 2019 ते सप्टेंबर 25, 2019 पर्यंत पुनरावलोकनाच्या अटीवर मुदतवाढ दिली आहे. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या निर्देश दि. सप्टेंबर 19, 2018, अन्वये वरील बँक, सप्टेंबर 25, 2018 पासून निर्देशांखाली ठेवण्यात आली आहे. मार्च 25, 2019 रोजी देण्यात आलेल्या निर्देशाची वैधता, निर्देश दि. मार्च 19, 2019 अन्वये, पुनरावलोकनाच्या अटीवर, सहा महिन्यांसाठी म्हणजे मार्च 26, 2019 ते सप्टेंबर 25, 2019 पर्यंत वाढविण्यात आली आहे. मार्च 19, 2019 रोजीच्या निर्देशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे. रिझर्व बँकेने निर्देशात बदल केले ह्याचा अर्थ, वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारली किंवा वाईट झाली आहे असा घेण्यात येऊ नये. परिस्थितीवर अवलंबून वरील निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2274 |