<font face="mangal" size="3">भदोही नागरी सहकारी बँक लि., भदोही ह्यांना आरबी&# - आरबीआय - Reserve Bank of India
भदोही नागरी सहकारी बँक लि., भदोही ह्यांना आरबीआयकडून दंड लागु
एप्रिल 24, 2017 भदोही नागरी सहकारी बँक लि., भदोही ह्यांना आरबीआयकडून दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1)(सी) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, भदोही नागरी सहकारी बँक लि., भदोही ह्यांना, रु.20,000/- (रुपये वीस हजार) दंड लागु केला आहे. हा दंड, नाममात्र सभासदत्व, एक्सपोझर नॉर्म्स, आणि वैधानिक/इतर निर्बंध, प्रुडेंशियल आंतरबँकीय ग्रॉस एक्सपोझर मर्यादा, आणि आंतरबँकीय प्रतिपक्ष मर्यादा, तुमचा ग्राहक जाणा वरील नॉर्म्स ह्याबाबत, रिझर्व बँकेने दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे उल्लंघन केल्याबाबत लावण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती. त्यावर वरील बँकेने लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सल्ला व त्याबाबत वरील बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन, रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2875 |