<font face="mangal" size="3">दिलीप अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., बार्शी, सोलापुर - आरबीआय - Reserve Bank of India
दिलीप अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., बार्शी, सोलापुर ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु
डिसेंबर 3, 2018 दिलीप अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., बार्शी, सोलापुर ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(ब) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने दिलीप अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., बार्शी, सोलापुर, ह्यांचेवर रु.2.00 लाख (रुपये दोन लाख) दंड लागु केला असून, तो दंड, गुंतवणुकी व नॉन एसएलआर गुंतवणुकीवरील प्रुडेंशियल मर्यादांबाबत आरबीआयच्या सूचना/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले गेल्याने लागु करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने, वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1273 |