<font face="mangal" size="3">डॉ. शिवाजीराव निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव बँक ल&# - आरबीआय - Reserve Bank of India
डॉ. शिवाजीराव निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., निलंगा, महाराष्ट्र ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु
डिसेंबर 4, 2018 डॉ. शिवाजीराव निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., निलंगा, महाराष्ट्र ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, डॉ. शिवाजीराव निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., निलंगा, महाराष्ट्र ह्यांचेवर रु.1,80,000 (रुपये एक लाख ऎशी हजार) दंड लागु केला असून, तो दंड, आरबीआयने पुढील बाबतीत दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले गेल्याने लावण्यात आला आहे. (अ) केवायसी मार्गदर्शक तत्वांचे पालन न करणे (ब) कोणत्याही सीआयसीचे सभासदत्व न मिळविणे (क) आरबीआयने केलेल्या तपासणी अहवालाचे वेळेवारी समाधानकारक अनुपालन न करणे (ड) ठेवीदार शिक्षण व जाणीव निधी (डीईएएफ) मध्ये निधी हस्तांतरित केल्याचा कागदोपत्री पुरावा सादर न करणे (ई) निरनिराळ्या एक्सबीआरएल अहवालांचे अनियमित सादरीकरण भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे उत्तरही सादर केले नव्हते. ह्या प्रकरणातील सत्य विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1282 |