<font face="mangal" size="3">दि चित्तुर को-ऑपरेटिव टाऊन बँक लि. चित्तुर, आंध - आरबीआय - Reserve Bank of India
दि चित्तुर को-ऑपरेटिव टाऊन बँक लि. चित्तुर, आंध्र प्रदेश ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु.
मे 17, 2018 दि चित्तुर को-ऑपरेटिव टाऊन बँक लि. चित्तुर, आंध्र प्रदेश ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु होणारा) कलम 46(4) सह वाचित कलम 47 अ(1)(क) ने तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, दि चित्तुर को-ऑपरेटिव टाऊन बँक लि., चित्तुर, आंध्र प्रदेश ह्यांचेवर रु.10,000 (रुपये दहा हजार) दंड लागु केला आहे व हा दंड, संचालक व त्यांचे नातेवाईक ह्यांना कर्जे व अग्रिम राशी देण्याबाबत, भारतीय रिझर्व बँकेने दिलेल्या निर्देशांचे व मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्यामुळे लावण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर वरील बँकेने लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य, बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन, भारतीय रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाली असून त्यासाठी आर्थिक दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/3020 |