<font face="mangal" size="3">क-हाड अर्बन सहकारी बँक लि., मुंबई ह्यांचेवर आर&# - आरबीआय - Reserve Bank of India
क-हाड अर्बन सहकारी बँक लि., मुंबई ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु
मे 18, 2017 क-हाड अर्बन सहकारी बँक लि., मुंबई ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, क-हाड अर्बन सहकारी बँक लि., मुंबई ह्यांचेवर, घराच्या दुरुस्तीसाठीची कर्जे बाबतच्या मर्यादांच्या उल्लंघनाबाबत व भूखंड/जमीन विकत घेण्यासाठी कर्जे वळविण्याबाबत आरबीआयने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल, रु.15.00 लाख (रुपये पंधरा लाख) दंड लावला आहे. भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती. त्यावर त्या बँकेने लेखी उत्तरही सादर केले होते आणि तोंडी सादरीकरणही दिले होते. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की, उल्लंघने झाली असून त्याबाबत दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/3106 |