<font face="mangal" size="3">अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., सितापुर ह्यांचेवर आर - आरबीआय - Reserve Bank of India
अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., सितापुर ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु
मार्च 26, 2018 अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., सितापुर ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ (1)(क) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., सितापुर ह्यांचेवर, वरील अधिनियमाच्या कलम 27 खाली आवश्यक असलेले अहवाल सातत्याने सादर न केल्याने, रु.5,00,000 (रुपये पाच लाख) दंड लागु केला आहे. भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य विचारात घेऊन रिझर्व बँकेने निर्णय घेतला की वरील उल्लंघन प्रत्यक्षात झाले असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2550 |