RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

आरबीआई की घोषणाएं
आरबीआई की घोषणाएं

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

129701855

भारतीय रिजर्व बँकेने अंबरनाथ जय हिंद को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अंबरनाथ, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला

22 एप्रिल 2024

भारतीय रिजर्व बँकेने 01 एप्रिल 2024 रोजीच्या आदेशाद्वारे अंबरनाथ जय हिंद को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अंबरनाथ, महाराष्ट्र (बँक) वर ‘ठेव खात्यांची देखभाल - प्राथमिक (शहरी) सहकारी बँका’ यावरीलआरबीआयच्या निर्देशांच्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल ₹3 लाख (केवळ तीन लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अंतर्गत प्रदान केलेल्या भारतीय रिजर्व बँकेमध्ये निहित अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

आरबीआयद्वारे बँकेची 31 मार्च 2023 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात वैधानिक तपासणी करण्यात आली होती. वैधानिक तरतुदी/आरबीआय निर्देशांचे पालन न केल्याचे पर्यवेक्षी निष्कर्ष आणि त्या संदर्भात संबंधित पत्रव्यवहार यांवर आधारित, बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये म्हटल्याप्रमाणे, वरील निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का लावला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती.

नोटिशीला बँकेने दिलेल्या उत्तराचा विचार केल्यानंतर, भारतीय रिजर्व बँकेला, इतर गोष्टींबरोबरच आढळले की, बँकेवर पुढील आरोप कायम आहेत, ज्यामुळे बँकेवर आर्थिक दंड आकारला जाणे आवश्यक आहे. बँकेने (i) ग्राहकांना किमान शिल्लक आवश्यकतेबाबत एक महिन्याची नोटीस न देता बचत बँक खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्यासाठी निश्चित दंडात्मक शुल्क, (ii) निष्क्रिय खात्यांमध्ये किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल दंडात्मक शुल्क, आणि (iii) निष्क्रिय खाती सक्रिय करण्यासाठी शुल्क वसूल केले.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामधे बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा  हेतू नाही. याशिवाय, हा आर्थिक दंड लादणे हे बँकेच्या विरोधात आरबीआयने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईचा पूर्वग्रह न ठेवता आहे.

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2024-2025/156

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?