RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78509732

अॅक्सिस बँक लि. ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु

मार्च 5, 2018

अॅक्सिस बँक लि. ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु

फेब्रुवारी 27, 2018 रोजी भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) अॅक्सिस बँक लि. (ती बँक) ह्यांचेवर इनकम रेकग्निशन अँड अॅसेट क्लासिफिकेशन (आयआरएसी) नॉर्म्स बाबत आरबीआयने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल रु.30 दशलक्ष दंड लागु केला आहे. आरबीआयने वर दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे वरील बँकेने पालन न केल्याने बँकिंग विनियम अधिनियम 1949 च्या कलम 46(4)(1) सह वाचित, कलम 47अ(1)(क) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, आरबीआयने हा दंड लागु केला आहे.

ही कारवाई विनियमात्मक अनुपालनातील त्रुटींवर आधारित असून, वरील बँकेने तिच्या ग्राहकांबरोबर केलेल्या व्यवहारांच्या/करारांच्या वैधतेशी संबंधित नाही.

पार्श्वभूमी

मार्च 31, 2016 रोजीच्या वित्तीय स्थितीसंबंधाने वरील बँकेच्या वैधानिक तपासणीत, इतर बाबींबरोबर आढळून आले की, अकार्यकारी अॅसेट्सच्या (एनपीए) मूल्यमापनांबाबत आरबीआयने दिलेल्या निरनिराळ्या विनियमांचे उल्लंघन झालेले आहे. तपासणी अहवाल व इतर कागदपत्रे ह्यांच्या आधारे, नोव्हेंबर 16, 2017 दिनांकित एक नोटिस वरील बँकेला पाठविण्यात आली व आरबीआयने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल तिला दंड का लावण्यात येऊ नये ह्याची कारणे देण्यास सांगण्यात आले होते. ह्यावर वरील बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणीत दिलेले मौखिक सादरीकरण विचारात घेऊन आरबीआयने निर्णय घेतला की, आरबीआयच्या सूचना/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे पालन न केले गेल्याबाबतचे वरील आरोप सिध्द होत असून त्यासाठी आर्थिक दंड लावणे आवश्यक आहे.

जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2354

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?