RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

104380413

भारतीय रिझर्व्ह बँकेने बाजीराव आप्पा सहकारी बँक लिमिटेड, अंकलखोप (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला

05 जून 2023

भारतीय रिझर्व्ह बँकेने बाजीराव आप्पा सहकारी बँक लिमिटेड, अंकलखोप (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिझर्व्ह बँकेने 29 मे, 2023 रोजीच्या आदेशाद्वारे बाजीराव आप्पा सहकारी बँक लिमिटेड, अंकलखोप (महाराष्ट्र) (बँक) वर रिझर्व्ह बँकेच्या 'प्राथमिक (शहरी) सहकारी बँकांची गुंतवणूक' आणि KYC (केवायसी) निर्देश, 2016 यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे 2 लाख (केवळ दोन लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) कलम 46(4)(i) आणि 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व्ह बँकेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामधे बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही.

पार्श्वभूमी

31 मार्च 2022 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात आरबीआयने बँकेची केलेली वैधानिक तपासणी आणि जोखीम मूल्यांकन अहवाल, तपासणी अहवाल आणि त्याच्याशी संबंधित सर्व संबंधित पत्रव्यवहाराची तपासणी, यावरून असे निदर्शनास आले की, बँकेने (i) प्रुडेंशियल इंटर-बँक ग्रॉस तसेच सिंगल काउंटर पार्टी एक्सपोजर मर्यादेचे पालन केले नाही (ii) खात्यांच्या KYC च्या नियतकालिक अद्यतनासाठी एक प्रणाली स्थापित केली नाही आणि (iii) खात्यांच्या जोखमीच्या वर्गीकरणाच्या नियतकालिक पुनरावलोकनाची प्रणाली स्थापित केली नाही.त्यानुसार, बँकेला नोटीस बजावण्यात आली होती ज्यात बँकेला त्यात नमूद केल्याप्रमाणे आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड का लागू करू नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती.

नोटिशीला बँकेचे दिलेल्या उत्तराचा विचार केल्यानंतर, भारतीय रिझर्व्ह बँकेने निष्कर्ष काढला की वरील प्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे आणि अशा निर्देशांचे पालन न करण्याच्या मर्यादेपर्यंत आर्थिक दंड आकारला जाणे आवश्यक आहे.

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2023-2024/341

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?