धनलक्ष्मी बँक लिमिटेडवर, आरबीआय कडून दंडात्मक रक्कम लागु
05 नोव्हेंबर, 2015 धनलक्ष्मी बँक लिमिटेडवर, आरबीआय कडून दंडात्मक रक्कम लागु तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) व अँटी मनी लॉडरिंग (एएमएल) मानके ह्यावरील तिने दिलेल्या व इतर सूचनांचे उल्लंघन केल्याकारणाने आरबीआयने, धनलक्ष्मी बँक लि. ह्यांना, रु.10 दशलक्ष रुपयांचा दंड केला आहे. आरबीआयने वेळोवेळी दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे केलेले उल्लंघन विचारात घेऊन, बँकिंग विनियम अधिनियम, 1949 च्या कलम 46(4)(i) सह वाचित, कलम 47(अ)(1)(क) च्या तरतुदी खाली तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, रिझर्व बँकेने हा दंड लावला आहे. विनियामक अटींचे पालन करण्यातील त्रुटींवर आधारित ही कारवाई करण्यात आली असून, त्या बँकेने व तिच्या ग्राहकांनी केलेले व्यवहार किंवा करार ह्यांच्या वैधतेबाबत ही कारवाई नाही. पार्श्वभूमी मुंबई येथील आर्थिक गुन्हे कक्ष (ईओडब्ल्यु) कडून, केल्या जाणा-या चैाकशीखाली असलेल्या एका चालु खात्याबाबत केवायसी व एएमएल मार्गदर्शक तत्वांचे वरील बँकेने पालन केले नसल्याबाबत, रिझर्व बँकेने तिला कारणे दाखवा नोटिस बजावली होती. बँकेने दिलेली उत्तरे तसेच वैय्यक्तिक सादरीकरणे, दिलेली कागदपत्रे व माहिती ह्यावर विचार केल्यावर, रिझर्व बँक अशा निर्णयाप्रत आली की, तिने वेळोवेळी दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे उल्लंघन झाले असल्याने, त्या बँकेवर दंडात्मक रक्कम लावणे आवश्यक आहे. संगिता दास वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/1087 |
पेज अंतिम अपडेट तारीख: