RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78503587

डॉ. आंबेडकर नागरिक सहकारी बँक मर्यादित, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु.

ऑक्टोबर 31, 2018

डॉ. आंबेडकर नागरिक सहकारी बँक मर्यादित, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु.

भारतीय रिझर्व बँकेने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 (4) सह वाचित कलम 47अ(1)(क) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, डॉ. आंबेडकर नागरिक सहकारी बँक मर्यादित, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश ह्यांचेवर रु.50,000/- (रुपये पन्नास हजार) दंड लागु केला आहे. हा दंड, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असणारा) कलम 27 च्या तरतुदी आणि पर्यवेक्षणीय कृती साचा खालील तिच्यावर घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन केले जाण्यामुळे लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर आणि वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन भारतीय रिझर्व बँकेने निर्णय घेतला की उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1008

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?