RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

आरबीआई की घोषणाएं
आरबीआई की घोषणाएं

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

129245427

भारतीय रिझर्व बँकेने डॉ. जयप्रकाश मुंदडा अर्बन को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, हिंगोली, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला.

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 25 एप्रिल 2024 रोजीच्या आदेशाद्वारे डॉ. जयप्रकाश मुंदडा अर्बन को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, हिंगोली, महाराष्ट्र (बँक) वर भारतीय रिझर्व बँकेने नागरी सहकारी बॅंकांसाठी जारी केलेल्या ‘ अग्रीमचे (कर्जाचे) व्यवस्थापन’ तसेच प्रकटीकरण मानदंड, वैधानिक व इतर निर्बंधाच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹1.00 (केवळ एक लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47(A)(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

31 मार्च 2022 रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेची वैधानिक तपासणी भारतीय रिझर्व बँकेद्वारे केली गेली होती. पर्यवेक्षी निष्कर्षांवर आधारित भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याने आणि यासंबंधी केलेल्या पत्रव्यवहाराच्या आधारे बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यात म्हटल्याप्रमाणे वरील निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का आकारला जाऊ नये, याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती.

नोटीसला बँकेने दिलेले उत्तर आणि वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता, भारतीय रिझर्व बँक या निष्कर्षावर पोहोचली कि भारतीय रिझर्व बँकेच्या खालील निर्देशांचे पालन न केल्याचे आरोप सिद्ध होतात, आणि आर्थिक दंड लावला जाणे आवश्यक आहे. बँकेने (i) बुलेट परतफेड योजने अंतर्गत विहित नियामक मर्यादेपलीकडे सुवर्ण कर्ज मंजूर केले, आणि (ii) नाममात्र सदस्यांना विहित नियामक मर्यादेपेक्षा जास्त कर्ज मंजूर केले.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामध्ये बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहारांच्या किवा करारांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. तसेच, बँकेविरुद्ध भारतीय रिझर्व बँकेने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईसाठी पूर्वग्रह न ठेवता हा आर्थिक दंड लावला आहे.

 

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2024-2025/183

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?