RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

115049054

भारतीय रिझर्व बँकेने डॉ पंजाबराव देशमुख अर्बन कोऑपरेटीव बँक लिमिटेड, अमरावती, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला.

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 8 जानेवारी 2024 रोजीच्या डॉ पंजाबराव देशमुख अर्बन कोऑपरेटीव  बँक   लिमिटेड, अमरावती, महाराष्ट्रा (बँक) वर,  पर्यवेक्षी कृती तत्वांतर्गत,  रिझर्व बँकेने जारी केलेल्या विशेष निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि नागरी सहकारी बॅंकांसाठी कर्जाचे व्यवस्थापन , तसेच ‘आपला  ग्राहक ओळखा ( KYC) बद्दल 2016च्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 5.00 लाख (केवळ पाच लाख  रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46 (4)(i) आणि 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

हि कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामध्ये बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहारांच्या किवा करारांच्या वैध्यतेवर  प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही.

पार्श्वभूमी                                                                                                

31 मार्च 2022 रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेच्या जोखीम मुल्यांकन तपासणी अहवालात आणि या संबंधित सर्व पत्रव्यवहारावरून असे निदर्शनास आले कि बँकेने, i) पर्यवेक्षी कृती तत्वांतर्गत जारी केलेल्या विशेष निर्देशांचे पालन न करता जोखीम मूल्याच्या 100% पेक्षा जास्त नवीन कर्ज व अग्रिम मंजूर केले आहे, ii) बुलेट परतफेड योजनेंतर्गत नियामक मर्यादेपलीकडे सोन्याच्या दागिन्यावर कर्ज मंजूर केले गेले, iii)  ग्राहकांचे जोखीम वर्गीकरण केवायसी नुसार नियमितपणे अध्यतन केले नाही, iv) खात्यांचे जोखीम आधारित नियतकालिक पुनरावलोकन केले नाही आणि v) प्रभावी ओळख व संशयास्पद व्यवहारांची सूचना देणारी सुदृढ साफ्टवेयरची व्यवस्था बैंके कडे नाही. परिणामतः बँकेला कारण दाखवा  नोटीस बजावण्यात  आली होती, जामध्ये म्हटल्याप्रमाणे , वरील निर्देशांचे पालन करण्यास अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का आकारला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती.

नोटीसला बँकेने दिलेले उत्तर व वैयक्तीक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन व त्यानंतर केलेले अतिरिक्त निवेदन  विचारात घेता भारतीय रिझर्व बँक या निष्कर्षावर पोहोचली कि भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचे सिद्ध होते आणि आर्थिक दंड लावले जाणे आवश्यक आहे.

                                                                         

( योगेश दयाल )
मुख्य महा प्रबंधक

प्रेस प्रकाशनी :  2023 – 2024 /1760      

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?