<font face="mangal" size="3">भारतीय रिझर्व्ह बँके ने डॉ. पंजाबराव देशमुख अ&# - आरबीआय - Reserve Bank of India
भारतीय रिझर्व्ह बँके ने डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ओप बँक लि. अमरावती (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला
26 एप्रिल, 2017 भारतीय रिझर्व्ह बँके ने डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ओप बँक लि. ‘आपल्या ग्राहकांना ओळ्खा’ (के.वाय.सी.) च्या सदरात भारतीय रिझर्व्ह बँक व्दारा जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्या कारणाने रिझर्व्ह बँकेने बँककारी विनियमन अधिनियम, 1949 (सहकारी सोसायट्यांना यथालागू) च्या धारा 46(4) आणि धारा 47ए (1) (बी) अंतर्गत निहित प्रदत्त शक्तींचा प्रयोग करून डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ओप बँक लि. अमरावती वर ₹ 5.00 लाख (रुपये पाच लाख मात्र) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने कारण दाखवा नोटिस जारी करुन आणि त्यावरील बँकेच्या लिखित उत्तराचे परीक्षण केल्या नंतर उक्त बँकेने उल्लंघन केल्याचे प्रमाणित झाले व त्यामुळे रिझर्व्ह बँकेने सदर बँकेला दंडित केले आहे. अजीत प्रसाद प्रेस प्रकाशनी: 2016-2017/2912 |