भारतीय रिजर्व बँकेने अर्ली सॅलरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला - आरबीआय - Reserve Bank of India
भारतीय रिजर्व बँकेने अर्ली सॅलरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला
नोव्हेंबर 06, 2023 भारतीय रिजर्व बँकेने अर्ली सॅलरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला भारतीय रिजर्व बँकेने, 15 सप्टेंबर 2023 रोजीच्या आदेशाद्वारे, अर्ली सॅलरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे, महाराष्ट्र (कंपनी) वर “नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी – नॉन-सिस्टिमली महत्त्वाची नॉन-डिपॉझिट घेणारी कंपनी (रिझर्व्ह बँक) निर्देश, 2016" वर जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹3.20 लाख (केवळ तीन लाख वीस हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. हा दंड RBI Act, 1934 च्या कलम 58B मधील उप-कलम (5) च्या खंड (aa) सह कलम 58G च्या उप-कलम (1) च्या खंड (b) च्या तरतुदींनुसार रिजर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना लागू करण्यात आला आहे. ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामध्ये कंपनीने ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. पार्श्वभूमी ऑक्टोबर 2021 मध्ये घेतलेल्या पर्यवेक्षी भेट/परीक्षेच्या पूर्ततेसाठी भारतीय रिजर्व बँक आणि कंपनीमध्ये झालेला पत्रव्यवहार, इतर गोष्टींबरोबरच, सर्व आऊटसोर्स क्रियाकलापांचे अंतर्गत ऑडिट करण्यात कंपनी अयशस्वी ठरली आहे. त्यानंतर, कंपनीला नोटीस बजावण्यात आली होती ज्यात भारतीय रिजर्व बँकेच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड का लागू करू नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती. नोटीसला कंपनीचे उत्तर, अतिरिक्त माहिती आणि वैयक्तिक सुनावणी दरम्यान केलेल्या तोंडी प्रस्तुतीविचारात घेतल्यानंतर , भारतीय रिजर्व बँकेने निष्कर्ष काढला की वरील प्रमाणे भारतीय रिजर्व बैंकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचा आरोप सिद्ध झाला असुन अशा निर्देशांचे पालन न करण्याच्या मर्यादेपर्यंत आर्थिक दंड आकारला जाणे आवश्यक आहे. (योगेश दयाल) Press Release: 2023-2024/1251 |