आरबीआयकडून पाच अधिकृत डीलर बँकांना आर्थिक दंड लागु
डिसेंबर 21, 2016 आरबीआयकडून पाच अधिकृत डीलर बँकांना आर्थिक दंड लागु विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम, 1999 च्या (फेमा) अहवाल पाठविण्याच्या आवश्यकतांवरील भारतीय रिझर्व बँकेच्या सूचनांचे उल्लंघन केले असल्याकारणाने पुढील पाच बँकांना भारतीय रिझर्व बँकेने दंड ठोठावला आहे. दंडाच्या रकमेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
भारतीय रिझर्व बँकेने वेळोवेळी दिलेल्या सूचना/निदेश/मार्गदर्शक तत्वांचे केलेले उल्लंघन विचारात घेऊन, फेमा 1999 च्या कलम 11(3) च्या तरतुदींखाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने हे दंड ठोठावले आहेत. रिझर्व बँकेने वरील बँकांना कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या होत्या व त्यांच्या उत्तरादाखल, वरील बँकांनी त्यांची लेखी उत्तरे व मौखिक सादरीकरणेही सादर केली होती. ह्या प्रकरणांमधील सत्य गोष्टींचा विचार करुन रिझर्व बँक ह्या निर्णयाप्रत आली की उल्लंघने झाली असून दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1604 |
पेज अंतिम अपडेट तारीख: