भारतीय रिझर्व्ह बँकेने इंडिया होम लोन प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला - आरबीआय - Reserve Bank of India
भारतीय रिझर्व्ह बँकेने इंडिया होम लोन प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला
भारतीय रिझर्व्ह बँकेने 27 मे 2025 रोजीच्या आदेशाद्वारे इंडिया होम लोन प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र (कंपनी) वर भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या (KYC)’ वर जारी केलेल्या काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹32000/- (केवळ बत्तीस हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. नॅशनल हाऊसिंग बँक ॲक्ट, 1987 च्या कलम 52A अंतर्गत प्रदान केलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये निहित अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे. नॅशनल हाऊसिंग बँकद्वारे कंपनीची 31 मार्च 2023 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात वैधानिक तपासणी करण्यात आली होती. आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याचे पर्यवेक्षी निष्कर्ष आणि त्या संदर्भात संबंधित पत्रव्यवहार यांवर आधारित, बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये म्हटल्याप्रमाणे, वरील निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का लावला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती. बँकेने नोटिशीला दिलेल्या उत्तर आणि वैयक्तिक सुनावणी दरम्यान केलेले तोंडी सादरीकरण यांचा विचार केल्यानंतर, भारतीय रिझर्व्ह बँकेला, आढळले की, बँकेविरुद्ध पुढील आरोप कायम आहे, ज्यामुळे बँकेवर आर्थिक दंड आकारला जाणे आवश्यक आहे. कंपनी खालील गोष्टी करण्यात अपयशी ठरली
ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामधे कंपनीने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. याशिवाय, हा आर्थिक दंड लादणे हे कंपनीच्या विरोधात आरबीआयने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईचा पूर्वग्रह न ठेवता आहे. (Puneet Pancholy) Press Release: 2025-2026/469 |