RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Press Releases Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

108879389

भारतीय रिझर्व्ह बँकेने इंद्रायणी को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड, पिंपरी, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला

ऑक्टोबर 23, 2023

भारतीय रिझर्व्ह बँकेने इंद्रायणी को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड, पिंपरी, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिझर्व्ह बँकेने 25 सप्टेंबर 2023 रोजीच्या आदेशाद्वारे इंद्रायणी को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड, पिंपरी, महाराष्ट्र (बँक) वर रिजर्व बँकेच्या ‘उत्पन्नाची ओळख, मालमत्तेचे वर्गीकरण, तरतूद आणि इतर संबंधित बाबी – UCBs’ आणि ‘भारतीय रिजर्व बँक तुमचा ग्राहक जाणा (KYC) निर्देश 2016', यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे ₹3 लाख (केवळ तीन लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 कलम 46(4)(i) आणि 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व्ह बँकेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामधे बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही.

पार्श्वभूमी

31 मार्च 2022 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात आरबीआयने बँकेची केलेली वैधानिक तपासणी, तपासणी अहवाल, जोखीम मूल्यांकन अहवाल आणि त्याच्याशी संबंधित सर्व संबंधित पत्रव्यवहाराची तपासणी, यावरून असे निदर्शनास आले की बँकेने (i) उत्पन्न ओळख, मालमत्तेचे वर्गीकरण आणि तरतूदीशी संबंधित विवेकपूर्ण नियमांचे पालन केले नाही, आणि (ii) आपल्या ग्राहकांच्या KYC च्या नियतकालिक अद्यतनासाठी प्रणाली लागू केली नाही. त्यानुसार, बँकेला नोटीस बजावण्यात आली होती ज्यात बँकेला त्यात नमूद केल्याप्रमाणे, निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का लागू करू नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती.

नोटिशीला बँकेचे उत्तर आणि वैयक्तिक सुनावणी दरम्यान केलेले तोंडी सादरीकरण यांचा विचार केल्यानंतर, भारतीय रिझर्व्ह बँकेने निष्कर्ष काढला की वरील प्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे आणि अशा निर्देशांचे पालन न करण्याच्या मर्यादेपर्यंत आर्थिक दंड आकारला जाणे आवश्यक आहे.

(योगेश दयाल)  
मुख्य महाप्रबन्धक

प्रेस प्रकाशनी: 2023-2024/1167

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?