भारतीय रिझर्व बँकेने जनसेवा को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, नाशिक, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला. - आरबीआय - Reserve Bank of India
भारतीय रिझर्व बँकेने जनसेवा को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, नाशिक, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला.
भारतीय रिझर्व बँकेने 13 फेब्रुवारी 2024 च्या आदेशाद्वारे जनसेवा को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, नाशिक, महाराष्ट्र (बँक) वर ‘संचालक , त्यांचे नातेवाईक आणि फर्म/संस्था ज्यामध्ये त्यांना रस आहे त्यांना कर्ज आणि अग्रिम देण्यासंबंधीचे निर्देश, व ‘संचालकांना कर्ज आणि अग्रिम इत्यादि - जामीनदार/हमीदार म्हणून संचालक-स्पष्टीकरण' यासंबंधी नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळा संबंधी जारी केलेल्या निर्देशांसहीत लागू असलेल्या भारतीय रिझर्व बँकेने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन/पालन न केल्याबद्दल ₹50,000/- (केवळ पन्नास हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे. (श्वेता शर्मा) प्रेस प्रकाशनी: 2023-2024/1918
प्ले हो रहा है
ऐका
|