<font face="mangal" size="3">भारतीय रिजर्व बँकेने जिजाऊ कमर्शिअल को-ऑपरेé - आरबीआय - Reserve Bank of India
भारतीय रिजर्व बँकेने जिजाऊ कमर्शिअल को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, अमरावती, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला
12 डिसेंबर 2022 भारतीय रिजर्व बँकेने जिजाऊ कमर्शिअल को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, अमरावती, महाराष्ट्र भारतीय रिजर्व बँकेने नागरी सहकारी बँकांसाठी तुमचे ग्राहक ओळखा (केवायसी) व ऑन साईट एटीम सुरू करण्याकरिता जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन/पालन न केल्यामुळे जिजाऊ कमर्शिअल को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, अमरावती, (महाराष्ट्र) (बँक) वर भारतीय रिजर्व बँकेने, दिनांक ०५ डिसेंबर २०२२ च्या आदेशाद्वारे ₹१.२५ लाख (केवळ एक लाख पंचवीस हजार रुपये मात्र) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. भारतीय रिजर्व बँकेने जारी केलेल्या उपरोक्त निर्देशांचे पालन करण्यास बँक असमर्थ राहिली हि बाब लक्षात घेऊन, बँकिंग नियमन अधिनियम, १९४९, च्या कलम ४६ (४) (i) व कलम ५६ सहवाचलेल्या कलम ४७ ए (१) (सी) मध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदीनुसार, आपल्या अधिकाराचा वापर करीत हा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामधे बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. पार्श्वभूमी ३१ मार्च २०२१ रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेच्या तपासणी अहवालात, इतर बाबींसह असे दिसून आले कि बँकेने भारतीय रिजर्व बँकेद्वारे जारी केलेल्या उपरोक्त निर्देशांचे उल्लंघन/पालन न करता (i) आपल्या ग्राहकांचे नियमित केवायसी अद्यतन केलेले नाही. आणि (ii) ऑन साईट एटीम उघडण्यासाठी आरबीआय ने जारी केलेल्या निर्देशांचे पालन केले नाही व याच आधारे निर्देशांचे पालन न केल्यामुळे बँकेवर दंड का लादला जाऊ नये याची कारणे दाखवा असे सूचित करणारी नोटीस बँकेला बजावण्यात आली होती. या बाबतीत बँकेने दिलेले उत्तर, वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन व त्यानंतर बँकेने अतिरिक्त पुरवलेली माहिती विचारात घेता, भारतीय रिजर्व बँक या निष्कर्षावर पोहोचली कि भारतीय रिजर्व बँकेद्वारे घोषीत निर्देशांचे पालन न केल्याचे सिद्ध होते आणि आर्थिक दंड लावले जाणे आवश्यक आहे. (योगेश दयाल) प्रेस प्रकाशन: 2022-2023/1347 |