लातुर येथील, लातुर अर्बन (नागरी) सहकारी बँक लि. वर, आरबीआयद्वारे सांपत्तिक दंडाची अंमलबजावणी
ऑगस्ट 25, 2015 लातुर येथील, लातुर अर्बन (नागरी) सहकारी बँक लि. वर, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (सहकारी बँकांना लागु असलेल्या, कलम 46 (4) सह वाचित, कलम 47 (1)(ब) च्या तरतुदींखाली मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, लातुर अर्बन सहकारी बँक लि., लातुरवर, तुमचा ग्राहक जाणाच्या नॉर्म्सचे व आरबीआयच्या सूचनांचे, वरील 476 मधील उल्लंघन केल्याबद्दल, रु.5.0 लाख (रुपये पाच लाख) सांपत्तिक दंड लावला आहे. भारतीय रिझर्व बँकेने संदर्भित बँकेवर एक कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याला त्या बँकेने लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य बाबींचा विचार केल्यानंतर, रिझर्व बँक, ह्या निष्कर्षावर आली की, उल्लंघन निश्चितपणे झाले असून, सांपत्तिक दंड लावणे आवश्यक आहे. अनिरुध्द डी. जाधव वृत्तपत्रांसाठी निवेदन : 2015 - 16/490 |
पेज अंतिम अपडेट तारीख: