<font face="mangal" size="3">मे. श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि. ह्यांचेव&# - आरबीआय - Reserve Bank of India
मे. श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि. ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु
एप्रिल 11, 2017 मे. श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि. ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 58ब च्या पोटनियम 5 (अअ) सह वाचित, कलम 58 जी (1)(ब) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, मे. श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि. (ती कंपनी) ह्यांना, रिझर्व बँकेने वेळोवेळी दिलेल्या निदेशांचे/आदेशांचे उल्लंघन केल्याच्या कारणाने, रु.20 लाख (रुपये वीस लाख) दंड लागु केला आहे. पार्श्वभूमी नोव्हेंबर 2015 मध्ये भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 (आरबीआय अधिनियम 1934) च्या कलम 45 एन खाली, ह्या कंपनीच्या कर्ज खात्यांच्या काही नमुना तपासणी करण्यात आली होती. त्यात असे दिसून आले की, ह्या कंपनीने, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 एल खाली ह्या बँकेने दिलेल्या, उचित आचार संहितेच्या निरनिराळ्या तरतुदींचे उल्लंघन केले आहे. ह्या छाननीमध्ये आरबीआयच्या निदेशांची निरनिराळी उल्लंघने केल्याचे आढळून आल्याने, ऑगस्ट 1, 2016 रोजी ह्या कंपनीला दंड लावण्याबाबत एक कारणे दाखवा नोटिस (एससीएन) देण्यात आली होती. वरील एससीएनला ह्या कंपनीने दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याचे दिसून आले. फेब्रुवारी 14, 2017 रोजी, आरबीआय अधिनियम, 1934 च्या कलम 58 जी (2) खाली ह्या कंपनीला वैय्यक्तिक सुनावणीची संधीही देण्यात आली होती. ह्या प्रकरणातील सत्य व ह्या कंपनीने दिलेले उत्तर विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की, छाननी दरम्यान आढळलेली उल्लंघने खरोखर झालेली असून त्यासाठी ह्या कंपनीला दंड लावणे आवश्यक आहे. त्यानुसार ह्या कंपनीला रु.20 लाख दंड ठोठावण्यात आला आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2742 |