RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

129258290

भारतीय रिझर्व बँकेने महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर, महाराष्ट्र ला आर्थिक दंड ठोठावला.

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 08 ऑगस्ट, 2024 च्या आदेशाद्वारे महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर, महाराष्ट्र (बँक) ला, उत्पन्नाचे निर्धारण आणि संपत्तीचे वर्गीकरण (आयआरएसी-आयरॅक) यासंबंधी भारतीय रिझर्व बँकेने जारी केलेल्या काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल आणि  बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 56 सह लागू असलेल्या कलम 26A  चे उल्लंघन केल्याबद्दल ₹2.00 लाख  (केवळ दोन लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. हा दंड बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या  कलम 47A(1)(c) सह लागू असलेल्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 अन्वये,  भारतीय रिझर्व  बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून  ठोठावण्यात आला आहे .

31 मार्च, 2023 रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेची वैधानिक तपासणी भारतीय रिझर्व बँकेद्वारे केली गेली होती. या तपासणी अहवालातील पर्यवेक्षी निष्कर्षांचे भारतीय रिझर्व बँकेचे निर्देश आणि  वैधानिक तरतुदीनुसार पालन न केल्याने आणि यासंबंधी केलेल्या पत्रव्यवहाराच्या आधारे बँकेला नोटीस बजावण्यात आली होती. त्यात  म्हटल्याप्रमाणे , भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशांचे आणि बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या तरतुदींचे पालन करण्या अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड कां आकारला जाऊ नये याची कारणे दाखवा, अशी विचारणा करण्यात आली होती. नोटीसला बँकेने दिलेले उत्तर व  वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता, अन्य  बाबींसह, भारतीय रिझर्व बँकेला असे आढळले, की काही विशिष्ट कर्ज खात्यांचे एनपीए म्हणून वर्गीकरण  करण्यात बँक अयशस्वी झाली आणि  त्यामुळे मालमत्तेच्या वर्गीकरणात फरक पडला आहे. तसेच  ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये पात्र शिल्लक रक्कम निर्धारित वेळेच्या आत हस्तांतरित न  केल्याचे  आरोप  सिद्ध होत आहे आणि आर्थिक  दंड लावला जाणे आवश्यक आहे.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि या बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. तसेच, हा आर्थिक दंड बँकेविरुद्ध भारतीय रिझर्व बँकेने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईबाबत  पूर्वग्रह न ठेवता लावण्यात आलेला आहे. 

(पुनीत पंचोली)  
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2024-2025/952

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?