भारतीय रिझर्व बँकेने नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित, नाशिक महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला. - आरबीआय - Reserve Bank of India
भारतीय रिझर्व बँकेने नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित, नाशिक महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला.
भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 18 जानेवारी 2024 च्या आदेशाद्वारे नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित, नाशिक, महाराष्ट्र (बँक) वर, भारतीय रिझर्व बँकेने जारी केलेल्या ‘आपला ग्राहक ओळखा’ च्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹1.00 लाख (केवळ एक लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46 (4)(i) आणि 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.. हि कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामध्ये बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहारांच्या किवा करारांच्या वैध्यतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. पार्श्वभूमी 31 मार्च 2022 रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेच्या जोखीम मुल्यांकन तपासणी अहवालात, आणि या संबंधित सर्व पत्रव्यवहारावरून असे निदर्शनास आले कि बँकेने ग्राहकांच्या खात्यांची, जोखमीच्या श्रेणीनुसार नियतकालिक पुनरावलोकन करण्याची कोणतीही प्रणाली स्थापन केलेली नाही जे भारतीय रिझर्व बँकने जारी केलेल्या उपरोक्त निर्देशांचे उल्लंघन आहे. परिणामतः बँकेला कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, जामध्ये म्हटल्याप्रमाणे , वरील निर्देशांचे पालन करण्यास अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का आकारला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती. नोटीसला बँकेने दिलेले उत्तर व वैयक्तीक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता भारतीय रिझर्व बँक या निष्कर्षावर पोहोचली कि वर उल्लेखित, भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचे सिद्ध होते आणि आर्थिक दंड लावले जाणे आवश्यक आहे. (योगेश दयाल) प्रेस प्रकाशनी : 2023 – 2024 / 1782 |