<font face="mangal" size="3">भारतीय रिझर्व बँकेने ओस्मानाबाद जनता सहकार - आरबीआय - Reserve Bank of India
भारतीय रिझर्व बँकेने ओस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड, ओस्मानाबाद (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला
२० फेब्रुवारी, २०२३ भारतीय रिझर्व बँकेने ओस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड, ओस्मानाबाद (महाराष्ट्र) वर भारतीय रिझर्व बँकेने आपल्या दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ च्या आदेशाद्वारे ओस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड, ओस्मानाबाद (महाराष्ट्र) वर ठेवीदार शिक्षण आणि जाणीव निधी योजना २०१४ (DEAF योजना) मध्ये जाहीर केलेल्या दिशानिर्देश्कांचे उल्लंघन/पालन न केल्याबद्दल ₹१.५0 लाख (केवळ रुपये एक लाख पन्नास हजार) चा दंड ठोठावला आहे. हा दंड, उपरोक्त दिशानिर्देश्कांचे पालन करण्यास बँक असमर्थ राहिली हि गोष्ट लक्षात घेता बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ४७ ए(१)(सी) आणि सह वाचलेल्या ४६(४)(i) आणि कलम ५६ मध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदीनुसार भारतीय रिजर्व बँकेद्वारे आपल्या अधिकाराचा वापर करीत लावण्यात आला आहे. हि कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामध्ये बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहारांच्या किवा करारांच्या वैध्यतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. पार्श्वभूमी ३१ मार्च २०२१ रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेच्या जोखीम मुल्यांकन तपासणी अहवालात, इतर बाबींसह, असे दिसून आले कि बँकेने, ठेवीदार शिक्षण आणि जाणीव निधीत (DEAF), हक्क न केलेल्या पात्र ठेवी, विहित वेळेत स्थानांतरीत केली नाही. याच आधारे निर्देशांचे पालन न केल्यामुळे बँकेवर दंड का लादला जाऊ नये याची कारणे दाखवा असे सूचित करणारी नोटीस बँकेला बजावण्यात आली होती. या बाबतीत बँकेने दिलेले उत्तर, वैयक्तीक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता भारतीय रिजर्व बँक या निष्कर्षावर पोहोचली कि भारतीय रिजर्व बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचे सिद्ध होते आणि आर्थिक दंड लावले जाने आवश्यक आहे. (योगेश दयाल) प्रेस प्रकाशनी: 2022-2023/1752 |