RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

129698113

भारतीय रिझर्व बँकेने प्रेरणा नागरी सहकारी बँक लिमिटेड, औरंगाबाद (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 21ऑक्टोबर 2024, रोजीच्या आदेशाद्वारे प्रेरणा नागरी सहकारी बँक लिमिटेड, औरंगाबाद महाराष्ट्र (बँक) वर ‘संचालक, त्यांचे नातेवाईक आणि फर्म/संस्था ज्यामध्ये त्यांना स्वारस्य आहे त्यांना ऋण व अग्रिम देण्यासंबंधी’ भारतीय रिझर्व बँकेने जारी केलेल्या काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹2.00 लाख (केवळ दोन लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

दिनांक 31 मार्च 2023 रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेची वैधानिक तपासणी भारतीय रिझर्व बँकेद्वारे केली गेली होती. या तपासणी अहवालातील पर्यवेक्षी निष्कर्षांचे भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार पालन न केल्याने आणि यासंबंधी केलेल्या पत्रव्यवहाराच्या आधारे बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, त्यात म्हटल्याप्रमाणे, वरील निर्देशांचे पालन करण्यास अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का आकारला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती.

नोटीसला बँकेने दिलेले उत्तर व वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता अन्य बाबींसह भारतीय रिझर्व बँकेला असे आढळून आले कि बँकेविरुद्ध खालील आरोप सिद्ध होत आहे आणि आर्थिक दंड लावला जाणे आवश्यक आहे.

बँकेने अश्या फर्मला कर्ज मंजूर केले होते कि ज्या फर्ममध्ये संचालकांच्या नातेवाईकांचे स्वारस्य होते आणि संचालक त्या कर्जाचे हमीदार म्हणून उभे होते.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यात बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहारांच्या किवा करारांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. तसेच, बँकेविरुद्ध भारतीय रिझर्व बँकेने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईबद्दल पूर्वग्रह न ठेवता हा आर्थिक दंड लावला आहे.

(पुनीत पंचोली)
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी : 2024-2025/1385

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?