भारतीय रिझर्व बँकेने पुसद अर्बन को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, पुसद, महाराष्ट्र ला आर्थिक दंड ठोठावला. - आरबीआय - Reserve Bank of India
भारतीय रिझर्व बँकेने पुसद अर्बन को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, पुसद, महाराष्ट्र ला आर्थिक दंड ठोठावला.
भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 28 जून, 2024 च्या आदेशाद्वारे पुसद अर्बन को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, पुसद , महाराष्ट्र (बँक) ला, ‘नागरी सहकारी बॅंकांसाठी पर्यवेक्षी कृती फ्रेमवर्क (SAF)’ अंतर्गत जारी केलेल्या विशिष्ट निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल/ पालन न केल्याबद्दल ₹2.50 लाख (केवळ दोन लाख पन्नास हजार रुपये ) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे. दिनांक 31 मार्च, 2023 रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेची वैधानिक तपासणी भारतीय रिझर्व बँकेद्वारे केली गेली होती. या तपासणी अहवालातील पर्यवेक्षी निष्कर्षांचे, भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार पालन न केल्यामुळे आणि यासंबंधी केलेल्या पत्रव्यवहाराच्या आधारे बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यात म्हटल्याप्रमाणे, वरील निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का आकारला जाऊ नये, याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती. नोटीसला बँकेने दिलेले उत्तर आणि वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता, अन्य बाबींसह, भारतीय रिझर्व बँकेला असे आढळले की, बँकेने स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे ठेवीवर देऊ केलेल्या व्याज दरापेक्षा जास्त दराने व्याज देऊन, पर्यवेक्षी कृती फ्रेमवर्क अंतर्गत जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचा आरोप सिद्ध होतो आणि आर्थिक दंड लावला जाणे आवश्यक आहे. ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामध्ये बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. तसेच, बँकेविरुद्ध भारतीय रिझर्व बँकेने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईसाठी पूर्वग्रह न ठेवता हा आर्थिक दंड लावला आहे. (पुनीत पांचोली) प्रेस प्रकाशनी: 2024-2025/688 |